Diploma in Journalism and Mass Media
(in Marathi)

Xavier Institute of Communications (XIC) in association with APG Learning (Sakal Media Group) announces the PG Diploma in Journalism and Mass Media (in Marathi) for the Academic Year 2018-19.

डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास मीडिया (मराठी)

अभ्यासक्रमाची रूपरेषा:

एपीजी लर्निंग (एपी ग्लोबाले ग्रुपचे स्किलिंग आणि एज्युकेशन व्हर्टिकल, ज्यात सकाळ माध्यम समूहाचा समावेश आहे) झेवियर इंस्टीट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स च्या सहकार्याने शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास मीडिया हा अभ्यासक्रम सुरू करत आहे.

  • थिअरी आणि प्रॅक्टिकल्स एकत्रित शिकवणारा हा अभ्यासक्रम आहे.
  • पत्रकारिता आणि माध्यम समूहातील विविध तज्ञांकडून शिकण्याची संधी.
  • सकाळ माध्यम समूहातील विशेषज्ञांकडून ऑन जॉब ट्रेनिंग द्वारे थेट मार्गदर्शन.
  • प्रिन्ट, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल मिडीया या पत्रकारितेतील विविध क्षेत्रांचा एकत्रित अभ्यास.
  • अभ्यासक्रमाचे माध्यम मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये.
  • शंभर टक्के प्लेसमेंट सहाय्य.

अभ्यासक्रमाचा फायदा:

  • वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांच्या (प्रिंट, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल) क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही संपूर्ण समज आणि ज्ञान मिळवलेले कुशल पत्रकार व माध्यम व्यावसायिक होऊ शकता.
  • तुम्हाला विविध दृष्टिकोनातून सामाजिक समस्यांचे विश्लेषण करता येईल आणि विविध माध्यमांच्याद्वारे प्रेक्षकांना ते समजावून सांगता येईल प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवता येईल.
  • ऑन-जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांना माध्यम संस्थांचे काम कसे चालते हे जाणून घेता येईल.

प्रवेश पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी.